मुंबई : मध्य प्रेदेशमधील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत छापण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
वीर सावरकर हे आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्याच्यावरची आमची श्रद्धा आहे ती अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
भोपाळमध्ये काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहित नाही.. शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता?, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे. त्यावर बंदी आहे. तरीही अशी पुस्तके वाटली जातात. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
-सचिन सावंत यांनी केली ‘टिकटॉक’ स्टाईलने फडणवीसांवर टीका
-देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती मी समजू शकतो- जयंत पाटील
-मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार नारज; राजीनामा देणार असल्याच्या चर्चा