बीड : करोनाला रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावर कोणीही कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही असा सूचक इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबबात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कठीण प्रसंगात पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी अहोरात्र काम करून जनतेची काळजी घेत आहेत. मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे की कोणीही त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांचा सन्मान करा, शासनाच्या निर्णयांचे पालन करा, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यासह राज्यात कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला आहे. माझं संपूर्ण जनतेला आवाहन आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जे लोक जनसामान्यांमध्ये चुकीची माहिती पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी
देशात हे काय चाललं आहे?; रितेश देशमुख संतापला
कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“आईशपथ संजय राऊत यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”
…म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल; चित्रा वाघ यांनी केली मुख्यमंत्र्यांना विंनती