मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना वीजबिलाचा शॉक बसला आहे. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.
वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार असून राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्तावही तयार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या प्रस्तावात युनिट वापरानुसार सरकार दिलासा देणार आहे.
राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी 2019 साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे.
दरम्यान, 2019 साली जेवढा वीज वापर केला असेल तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात वीज बिल ग्राहकांना भरायचे आहे. त्यावरील वीज वापराचा भार राज्य सरकार उचलणार आहे. 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे, असं या प्रस्तावात नमूद केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
“विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय”
नोकरी गमावलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे