मुंबई : राज्यातल्या कोरोनाच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. रेमडिसिवीर संदर्भात खासगी हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये. फक्त सरकारी हाॅस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाॅस्पिटलमध्येही हवेत. रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल., असं फडणवीस यावेळी म्हणाले.
जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परीस्थितीत घर कसं चालवायचं असा प्रश्न आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये- सुधीर मुनगंटीवार
कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक- अशोक चव्हाण
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार”
“लाॅकडाऊन विरोधात साताऱ्यात उदयनराजेंकडून भीक मांगो आंदोलन; पहा व्हिडिओ