आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : काँग्रेसचे आमदार बलविंदरसिंग लड्डी यांनी पक्षाला धक्का देत सहा दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेेसने मोठा डाव खेळत लड्डी यांचं मतपरिवर्तन करून त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करून घेतली आहे.
हे ही वाचा : मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा
लड्डी यांच्यासह आणखी दोन आमदारांनी सहा दिवसांपूर्वी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला होती. यात फतेहसिंग बाजवा व राणा गुरमित सोधी या दोन आमदारांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. मात्र काँग्रेसनं जोरदार पुनरागमन करत लड्डी यांंचं मतपरिवर्तन करत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करून घेतली.
दरम्यान, लड्डी यांनी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत व उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या उपस्थितीत पक्षात घरवापसी करत भाजपला मोठा धक्का दिला.
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने
“विधान परिषदेचे भाजपचे आमदार आर.एन.सिंह यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन”
राष्ट्रवादीची भाजपच्या ‘या’ आमदाराला डायरेक्ट ऑफर?; चर्चांणा उधान