किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार- नाना पटोले

0
610

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीला लक्ष्य करताना दिसत आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आता काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा : नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहां- चित्रा वाघ

किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. उद्या काँग्रेस भाजप नेते किरीट सोमय्या वर गुन्हे दाखल करणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लाँडरींग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीनं आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये- बाळासाहेब थोरात

…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रीपद जाऊ शकतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला

मनसे करणार लवकरच मोठ्या भ्रष्टाचाराचा खुलासा; मनसेच्या नेत्याची माहिती 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here