मुंबई : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजपने आपापले उमेदवारी जाहीर केले आहेत. यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांना मिळेल, अशी शक्यता होती. त्यांचं नाव देखील संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर होतं. म्हणूनच सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्याला संधी मिळेल असं वाटत होतं. पण ती मिळाली नाही, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली होती.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय; निलेश राणेंच उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र
…म्हणून संजय राऊत यांनी मानले काँग्रेसच्या दोन नेत्यांचे आभार
‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार
…तर मी निवडणूक लढणार नाही; बाळासाहेब थोरातांना उद्धव ठाकरेंचा मेसेज