Home महाराष्ट्र ‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार

‘ती’ जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; त्यामध्ये आम्हाला ओढू नका- अशिष शेलार

मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेत जागा वाटपावरून वाद उभा राहिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी सुरू होती. याच विषयावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही, यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका!, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ही निवडणूक लढणार आहेत. यामुळे ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मी निवडणूक लढणार नाही; बाळासाहेब थोरातांना उद्धव ठाकरेंचा मेसेज

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर

…मग आपल्याला या सरकारची गरज काय?; निलेश राणे यांची राज्य सरकारवर टीका

केंद्र सरकारशी समनव्य साधून पायी जाण्याऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करा- देवेंद्र फडणवीस