“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, बरे होताच मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला”

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अखेर कोरोनामुक्त झाले आहेत.  कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे.

कोरोनामुक्त होताच थोरात यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली. या बैठकीत थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : ‘माई, तुझ्या प्रेमाला बंधन नाही’; गुगलनं वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

दरम्यान, 8 दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी., असं आवाहन थोरातांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

“…म्हणून अमृता फडणवीसांनी पाठवली विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस”

नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस; मुंबई महानगरपालिकेकडून नवी नियमावली जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here