आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती उघड झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या एका प्रवक्त्याच्या घरी भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं आहे. यावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं बाळासाहेब थोरातांनी यावेळी स्पष्ट केलं.
हे ही वाचा : “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?”
दरम्यान, माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचंही थोरातांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
महिलांबाबत आदर असलाच पाहिजे; मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी
तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या….