“काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष, तुम्ही भाजपला मत द्या”

0
151

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांवर 5 राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. प्रचारसभांना सुरूवात झाली असून आपल्या पुर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आसामधील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहेे.

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भाजपलाच मत द्या, असं स्मृती ईराणी म्हणाल्या. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा जनतेला पुर्ण लाभ घेता येणार आहे, असंही स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आसाममध्ये अनेक मोठे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र राज्याचा विकास, गरिबांचं कल्याण मात्र काही झालं नाही. फक्त पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिलं असल्याचं स्मृती ईराणी यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली- चंद्रकांत पाटील

“मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”

बाॅलिवूडकरांवर कोरोनाचं सावट! बॉलिवूडचे आणखी 2 मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

“राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here