आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काल बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार, असा जोरदार पलटवार नाना पटोले यांनी केला. सुजय विखे पाटील अजून मुलगा आहे, असा टोला पटोले यांनी लगावला. ते आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”
दरम्यान, ‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी काल काँग्रेसवर केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”
उद्धव ठाकरे किती भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे- चंद्रकांत पाटील
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”