Home महाराष्ट्र काँग्रेसचं राष्ट्रवादीला मोठं खिंडार; सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचं राष्ट्रवादीला मोठं खिंडार; सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : परभणी जिल्ह्यातील सेली नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील 24 विद्यमान नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी, आणि औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस , भाजपा, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सेलु नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश काळे, भाजपाचे जिंतुर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख तसेच जिंतुर नगरपालिकेच्या 4 विद्यमान नगरसेवकांनी व दोन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपडकर, आमदार अमर राजूरकर, माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 25 तारखेला पुणे दाैऱ्यावर”

किरीट सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

जळगावमध्ये शिवसेनेचा भाजपला पुन्हा दणका; आणखी 2 नगरसेवक फोडले