Home पुणे काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले

पुणे : काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, अजित पवार  पुन्हा एकदा आम्हाला साथ देतील आणि सरकार येईल, असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मी येईन, अशासाठी म्हणतात, की अजितदादा एक दिवस त्यांच्यासोबत येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. अजितदादा एकदा तिथे जाऊन आलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षा आहे, की एक दिवस अजित पवार आपल्यासोबत येतील, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत”

“चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे”