नाशिक : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव तालुक्यात शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
15 तारखेनंतर सार्वजनिक जागेत समारंभ, विवाहांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, समारंभ बंद राहणार आहेत. धार्मिक स्थळे सार्वजनिक वापरासाठी रात्री 7 ते सकाळी 7 बंद राहणार आहेत. तसेच पूजाविधींनाही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी आणि रविवारी मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची आज रात्री 12 वाजलेपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला ‘हा’ अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय वायरल; पहा व्हिडीओ
अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार
तपासाला सहकार्य करणाऱ्या एकनाथ खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न
“महाबळेश्वर हादरलं! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनावर शाळेतच बलात्कार”