आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिकाच सूरू आहे.
मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोलानंतर आता सोलापूरातही सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून आता शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं सदावर्तेंची तुलना थेट गाढवाशी करत सदावर्तेवर जोरदार निशाणा साधला.
हे ही वाचा : राज ठाकरेंचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला, म्हणाले…
गुणरत्न सदावर्ते त्याच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडला आहे. अनेक जिल्ह्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की, सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस.टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी ड्युटीवर रुजू झाले आहेत. सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता, असं मत शिवसेनेनं यावेळी व्यक्त केलं.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बाॅबी डार्लिंग; मनसेचा टोला
…अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मी, मान्य करतो; गुणरत्न सदावर्तेंकडून कबुली