मुंबई : खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील ‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी
कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही; धनंजय मुंडेचा जनतेला सूचक इशारा
देशात हे काय चाललं आहे?; रितेश देशमुख संतापला
कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“आईशपथ संजय राऊत यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”