मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं.
गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत., असं अस्लम शेख म्हणाले.
दरम्यान, साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं. ते मु्ंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस
वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा