लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

0
187

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये गृहसचिवांना बदल्यांच्या रॅकेट संदर्भात एक अहवाल सादर केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अहवालाची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीला येताना गृह सचिवांकडे बॉम्ब घेऊन आले होते. पण तो लवंगी फटाका असून त्याला वातही नाही, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

मी सादर केलेला अहवाल लवंगी फटाका आहे की, बॉम्ब? हे लवकरच स्पष्ट होईल. असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं- तृप्ती देसाई

“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”

महाविकासआघाडी सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here