मुंबई : परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापून निघालं आहे. यावर खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका करणारी फेसबूक पोस्ट लिहिली. आता या प्रकरणामध्ये आता भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं आणि माझ्या प्रश्नांची तातडीने उत्तर द्यावी, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकर यांना याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून पुण्यात आंदोलन कधी करणार आहात? 15 दिवस हे प्रकरण राज्यभर गाजत असताना पुण्यात राहूनही एक शब्द तुम्ही काढला नाही याबाबत स्पष्टीकरण कधी देणार आहात? करुणा शर्मा मुंडे यांनी मुंबई पोलिसांना तक्रार दिली त्या बाबतीत काय ऍक्शन घेणार? अशा प्रकारचे नानाविध प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”
महाविकासआघाडी सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस
“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण”