Home महाराष्ट्र येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला...

येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सरकारला रोषाला सामोरे जावे लागले, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर संभाजीनगरमध्ये देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मराठा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. आता त्यांनी मन मोठं करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच हे सरकार कोर्टाच्या प्रक्रियेतूनच सत्तेवर आले आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टात कशी बाजू मांडावी, हे आम्हाला त्यांना सांगण्याची गरज नाही, असंही मराठा क्रांती मोर्चानं यावेळी म्हटलं.

हे ही वाचा : “शिंदे गटाला धक्का; 15 दिवसांपूर्वी प्रवेश केलेला कोल्हापूरचा ‘हा’ नेता पुन्हा स्वगृही परतला”

दरम्यान, याबाबतचा नवा वाद किंवा कायदेशीर उत्तर आता सरकारकडून नको आहे. या प्रकरणी सरकार काय भूमिका घेणार हे सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..

महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता ‘या’ राज्यातील 40 आमदार नाॅट रिचेबल, चर्चांना उधाण

 नारायण राणेंना बाळासाहेबांनी अक्षरश: हाकलून दिलं होतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं सांगितला जुना प्रसंग