Home महाराष्ट्र “चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली; भाजपकडून ‘या’ उमेद्वाराला संधी”

“चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली; भाजपकडून ‘या’ उमेद्वाराला संधी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ महिला या सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवत असतात. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून चित्रा वाघ यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. पण चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली आहे.

हे ही वाचा : एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार- गोपीचंद पडळकर

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. धुळ्यातून अमरिश पटेल, कोल्हापूर येथून अमन महाडिक, अकोल्यातून वसंत खंडेलवाल तर नागपूर येथून चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई विभागातून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. पण भाजपकडून मुंबई विभागात राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मंत्रीपद हुकल्यामुळं नानांनी मानसिक संतुलन गमावलं; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका”

अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित; ट्वीट करत दिली माहिती

…तर हे काळीज नसलेलं सरकार आहे; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र