“कोरोना संसर्गाबाबत चीनचा मोठा खुलासा”

0
164

चीनने कोरोनाची माहिती इतर देशांना कळविण्यास जाणून-बुजून उशीर केला असा आरोप विविध देश चीनवर करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने आता मोठा खुलासा केला आहे.

चीनने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक श्वेतपत्रिका काढली आहे. या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून साथीची माहिती देण्यास उशीर केल्यासह चीनने इतर आरोप फेटाळून लावले आहेत.

वुहान शहरात 27 डिसेंबरला सर्वप्रथम कोरोना विषाणू आढळला, तर त्याचा संसर्ग होत असल्याचे 19 जानेवारीला समोर आले, असं चीनने या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

दरम्यान, या नव्या आजाराबद्दल तज्ञांनी इशारा दिल्यानंतर महिनाभराच्या आतच पथकानं हे काम केले, तसंच त्यानंतर काही तासांतच लोकांना त्याबद्दलची माहिती देण्यात आली, असं चीनने श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे; राजनाथ सिंग यांची राज्य सरकारवर टीका

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण नाही- राजू पाटील

“शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”

“…तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here