कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर समितीचे आबा पाटील यांनी माध्यामांशी बोलताना राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा 6 ऑक्टोबर रोजी मातोश्री च्या बाहेर आंदोलन करू, असा इशारा मराठा आंदोलकांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, तसेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे तरूणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मुख्यमंत्र्यांनी लवकर घराबाहेर पडत आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही आबा पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे
“भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण”
…अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल- पार्थ पवार
हे कधी थांबणार आहे?; हाथरस प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची योगी आदित्यनाथांवर टीका
हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू