Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणार

मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास उघडी राहणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.

लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसच जीवनावश्यक वस्तू, अन्न-धान्य खरेदी करता यावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळण्यात याव्यात, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

लॉकडाऊनच्या काळात चंद्राकांत पाटलांचा नवा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

“बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार”

कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही; धनंजय मुंडेचा जनतेला सूचक इशारा

देशात हे काय चाललं आहे?; रितेश देशमुख संतापला