मुंबई : मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काैतुक केलं. तसेच आता दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणेच चालावं लागंल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल असंही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 24 तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे याची माहिती ते घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु असून राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे काैतुक केलं.
कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे., असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. तसेच राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन”
ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रूग्णांचा मृत्यू
माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय बनवलं- कंगणा रणाैत
रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय