“जे फडणवीसांना जमलं नाही, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांना झटका”

0
233

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील अशक्य वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. जी गोष्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जमली नाही, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं.

मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच प्रशासनाच्या निदर्शनास ते आणण्यात आलं. त्यानंतर प्रदीर्घ विचारांनंतर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले

सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“गॅस सिलेंडरच्या किंमतीत भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार”

महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here