आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सिंधुदुर्गातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या विमानतळाचा शुभारंभ केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेव केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहतील.
गेल्या अनेक महिन्यांपासून चिपी विमानतळाच्या उभारणीवरून शिवसेना व भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे विमानतळ सुरु झाले असल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांचे म्हणणं आहे. अशातच एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु करण्याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परवानगी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनीही त्यांच्याकडून शिकावं- किरीट सोमय्या
…तर 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा