Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं काैतुक, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं काैतुक, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नववर्षाच्या मुहू्र्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह येत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करत असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचं काैतुक केलं.

हे ही वाचा : “अमूल डेअरीवर मनसेचा धडाका; अमूल डेअरी कामगारांना मनसे नेते अविनाश जाधवांनी दिला न्याय”

उद्धव ठाकरेंनी मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त इक्बाल चहल, महेश झगडे यांची नावे नावं घेत त्यांचं विशेष काैतुक केलं. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी आपला मुलाचंही (आदित्य ठाकरे) विशेष काैतुक केलं.

दरम्यान, मीसुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाईची कामे नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकाऱ्यांसोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं काैतुक केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

“…म्हणजे नारायण राणेंना कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल”

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती