Home महाराष्ट्र शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधला.

‘राजकारण म्हटल्यावर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं तर यांनी काहीच केलं नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करु, आम्ही ते करु आणि यालाच तर राजकारण म्हणतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “…म्हणजे नारायण राणेंना कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल”

अनेकजण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत’, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

“मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट; महापालिका हद्दीतील 500 चाै. फुटापर्यंतच्या मालमत्ता कर केला रद्द”

मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल