मुंबई : महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 25, 2020
महत्वाच्या घडामोडी –
पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत-संजय राऊत
अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली कामगारांच्या मदतीला