मुंबई : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली होती. त्यानंतर महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे स्वत: शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सोलापूर शहर हे विविधतेनं नटलेलं शहर आहे. या शहराचा विचार हा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा होता. मात्र मध्यंतरी भाजपाच्या विचाराने प्रेरित वर्गामुळे सोलापूरचा चेहरा बदलला. हे चित्र पुन्हा बदलण्यासाठी महेश कोठे तसेच अन्य सहकाऱ्यांनी लक्ष घातले आहे., असं शरद पवार म्हणाले.
सोलापूर शहर हे विविधतेनं नटलेलं शहर आहे. या शहराचा विचार हा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा होता. मात्र मध्यंतरी भाजपाच्या विचाराने प्रेरित वर्गामुळे सोलापूरचा चेहरा बदलला. हे चित्र पुन्हा बदलण्यासाठी महेश कोठे तसेच अन्य सहकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. pic.twitter.com/S2g0focmdK
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 8, 2021
महत्वाच्या घडामोडी-
मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच- उदयनराजे भोसले
“नागपूरमध्ये पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागून इंजिनियरचा मृत्यू”
सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य
“संभाजी महाराज माफ करा आम्हांला, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”