Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. या बंडामुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. या बंडावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पहिल्यांदाच मुलाखत दिली.

ही मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. यावेळी त्यांनी ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : बंडखोरीआधी नेमकं काय घडलं?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा, म्हणाले…

त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी यावेळी दिलं.

दरम्यान, आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे, असं मत एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिंदे गटात यायला नकार दिल्यानं शिवसैनिकाला जोरदार मारहाण; सांगलीतील शिवसेना नगरसेविकाचा आरोप