“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या भेटीला; उद्धव ठाकरेही मातोश्रीवरून रवाना; ठाकरे-शिंदे भेट होणार?”

0
681

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना निमोनिया झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. तसेच मुख्यमंत्री शिंदे पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील पवारांच्या भेटीसाठी मातोश्रीवरून निघाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्या भेट घडून येणार? अशा चर्चांनी उधाण आलं होतं.

हे ही वाचा : शिंदे गटातील ‘हा’ नेता आमच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा मोठा गाैफ्यस्फोट

दरम्यान, मात्र एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेऊन ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर निघाले आहेत. त्यामुळे ठाकरे-शिंदे भेट होणार नाही, हे स्पष्ट झालंय. तसेच शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरे पवारांची भेट घेणार असल्याची माहिती कळतेय.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटातील ‘हा’ नेता आमच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा मोठा गाैफ्यस्फोट

“महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले, आधी कुंकू लाव, मग…”

पहिलीच वेळ असल्याने माफ करतो म्हणणाऱ्या बच्चू कडूंना, रवी राणांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here