लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील हर हर महादेव या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राज ठाकरे यांच्या मनसे अधिकृत या पेजवरून सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्तानं राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना, या चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! अकोटमध्ये भाजपचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित 2-3 पार्टमध्ये चित्रपट आणणार, अशी घोषणा राज ठाकरे यांनी या मुलाखतीत केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या या घोषणेमुळे शिवप्रेमी आणि प्रेक्षक हे खूप आनंदी झाले आहेत. या चित्रपटाला आवाज देण्याबाबत राज म्हणाले, ”हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता, तो 2003 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही.”

महत्त्वाच्या  घडामोडी –

नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का; पंचायत समितीत सर्व 13 जागांवर महाविकास आघाडीने मारली बाजी

राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आता ऋतुजा लटके यांना राज ठाकरेंनी दिला पाठिंबा; बिनविरोध निवडून देण्यासाठी फडणवीसांना लिहिलं पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here