Home महाराष्ट्र राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची पहिली...

राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलं आहे. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू, असं फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : आता ऋतुजा लटके यांना राज ठाकरेंनी दिला पाठिंबा; बिनविरोध निवडून देण्यासाठी फडणवीसांना लिहिलं पत्र

भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्याचं ते ट्विट चर्चेत; म्हणाले, मुख्यमंत्री राज ठाकरे…

राज ठाकरे देणार भाजप उमेदवाराला पाठींबा?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा