मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष चालू आहे. काँग्रेसने या नामांतराला विरोध दर्शवला आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, केवळ हिंदूंचे नव्हे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांचे शहाजी आणि शरीफजी ठेवले होते ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्या वरील श्रध्देने ठेवले होते. त्यांचे १/३ सैन्य मुस्लिम होते., असं सचिन सावंत म्हणाले.
त्याचबरोबर ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे ते राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी , आमच्या दैवतांनी स्थापन केले., असंही सावंत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे ते राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी , आमच्या दैवतांनी स्थापन केले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 2, 2021
महत्वाच्या घडामोडी-
…तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम
“राम मंदीराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडे जाणार”
“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि राहतील”
औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण