Home महाराष्ट्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा-...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा- वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी फेब्रुवारी आणी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी हा विचार केला जात असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. यंदा इयत्ता बारावीची परीक्षा ही 15 एप्रिलनंतर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर दहावीची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, याआधी राज्यातील 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती.

महत्वाच्या घडामोडी-

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते”

…तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम

“राम मंदीराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडे जाणार”

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि राहतील”