मुंबई : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला होता.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत., असं छगन भुजबळांनी म्हटलं होतं. यावर आत भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागतं की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. 2018 ला जेंव्हा ही केस सुरू झाली तेंव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली; चक्का जाम आंदोलनावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला
“…तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार”
“राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; पहा काय सुरू, काय बंद”
“देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”