Home महाराष्ट्र औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले असून यामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे  यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद  येथील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ  घातला.

पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तसेच पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे.

हे ही वाचा : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश

दरम्यान, कालपासून पंकजा मुंडे नॅाट रिचेबल आहेत. कालपासून आपण त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन दिवस पंकजा मुंडे बोलणार नाहीत अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगणं म्हणजे…; मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, कळलं देखील नाही की…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

…तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा