चंद्रकांतदादांना स्वप्नं बघण्याचा छंद; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
290

पुणे : महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?; असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली केली आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांतदादा म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असं  जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची होर्डिंगबाजी

पंतप्रधान मोदींमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?- जयंत पाटील

राज्यात 15 दिवस लाॅकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने…; दारुबंदीवरून चित्रा वाघ कडाडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here