“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं”

0
258

पुणे : सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं आहे. दादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावं लागणार आहे., असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे. दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला. महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा- वर्षा गायकवाड

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते”

…तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम

“राम मंदीराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडे जाणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here