चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला- अरुण लाड

0
442

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरूण लाड हे विजयी झाले आहेत. त्यानंतर अरूण लाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण ते 2 वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते, पण ज्या पदवीधरांच्या जीवावर ते निवडून गेले होते, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, असं म्हणत अरूण लाड यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, चंद्रकांतदादांनी टीव्हीवर मुलाखत दिली होती, की मी 2 वेळा निवडून आलो आहे. माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या. पण तुम्ही काही कामच केलं नाही, तर देशमुखांना काय निवडून द्यायचं. लोकांना हे पटलं नाही, आपल्यावर झालेला अन्याय खटकला. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने लोकांनी मला निवडून दिलं., असंही लाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी; भाजपचा पराभव

अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

“मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही”

“पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here