पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची चर्चा राज्यात जोरदार सुरू होती. यावर राज ठाकरे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसलं तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभा उभा चालता चालता मुततो. तसा विचार करत नाही मी. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत., असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे
“अभिमानास्पद! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून तब्बल 10 कोटींची मदत”
मी काय राज कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा खोचक सवाल
‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’; जयंत पाटलांनी दिली माहिती