Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की नवाब मलिक सारख्याला मी खिशात ठेवतो. त्यांचा खिसा एवढा मोठा आहे हे मला माहिती नव्हतं. मी वाट पाहतोय की त्यांनी आपल्या मोठ्या खिशात मला टाकावं. मी पाहिल त्यांच्या खिशात काय काय आहे आणि बाहेर येऊन जनतेला सांगेन. त्यांचा एवढा मोठा खिसा असेल तर लवकरात लवकर त्यांनी मला खिशात टाकावं मी वाट पाहतोय, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना एका पत्रकाराने नवाब मलिक यांच्या समीर वानखेडेंवरील टीकेबाबत विचारलं होतं. त्यावेळी नवाब मलिकांसारखे लोक आम्ही खिशात ठेवतो असं वक्तव्य केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यावर आता मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते…; धनंजय मुंडेंचा पलटवार

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकित 64 टक्के मतदान; भाजप का काँग्रेस, मतदारांचा कौल कुणाला?

‘2024’च्या निवडणुकीमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं; निलेश राणेंनी फुंकलं रणशिंग