Home महाराष्ट्र चंद्रकात पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली; हसन मुश्रीफांचा मोठा गाैफ्यस्फोट

चंद्रकात पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली; हसन मुश्रीफांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा मास्टरमाईंड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा मोठा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळं. चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यानंतर त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, त्यामुळे आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचे गुंड सोमय्यांना धमक्या देतात, त्यांच्या केसाला धक्का लावाल तर…; सदाभाऊ खोतांचा इशारा

“मोठी बातमी! किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात”

सरकारच्या दडपशाहीचा हिशेब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही; अतुल भातखळकरांची टीका

पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेग; पंकजा मुंडे लिहिणार नितीन गडकरींना पत्र