पुणे : करोनाला रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला आहे, याच पार्श्वभूमीवर जेवणाचा प्रश्न उद्भवलेल्या गरजवंतांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे.
जी माणसे धोका पत्करुन हे सर्व पोहोचवणार आहेत, त्यांना विनासायास ये-जा करता यावी, यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करुन मागणी नोंदवावी लागणार आहे. पोळीभाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मागणी करायची आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच केली जाईल. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यास रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे.
दरम्यान, आपल्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
“बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार”
कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही; धनंजय मुंडेचा जनतेला सूचक इशारा
देशात हे काय चाललं आहे?; रितेश देशमुख संतापला
कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!