आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच वाद सुरु झाला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेंकांवर टीका केली होती. टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत फक्त एका कर्यक्रमात एकत्र नाही तर ते या विवाह सोहळ्यात एका सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले आहेत.
हे ही वाचा : पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे
देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शेवसेना या सर्व पक्षांचे नेते पाहायला मिळाले आहेत. टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले.
दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त करत हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं म्हंटलं होतं. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टीका केली होती. या दोन्ही नेत्यांच्या टीका सत्रानंतर आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही दिसून आल्या.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून बाळासाहेब थोरातांची टीका
राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकीय पोळी भाजा, पण…; एसटी संपावरुन अनिल परब यांचा पडळकर आणि खोतांना इशारा