Home महत्वाच्या बातम्या केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- अण्णा हजारे

केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- अण्णा हजारे

अहमदनगर :  प्रजासत्ताकदिनादिवशी राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे, असं म्हणत दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी 40 वर्षे आंदोलन करत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होतं आणि गालबोट लागतं असंही अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…हे केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका- प्रविण दरेकर

…तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही- उद्धव ठाकरे

“शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार