नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
In view of uncertain conditions due to COVID & feedback obtained from stakeholders, it has been decided that Class 12 Board Exams would not be held this year. CBSE to take steps to compile results of Class 12 students as per well-defined objective criteria in a time-bound manner.
— ANI (@ANI) June 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल”
संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये- देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणं भाग्य पडेल- नितेश राणे
“बारामतीत अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा गोळीबार हल्ला”